सह जिल्हा निबंधक
महाराष्ट्र राज्य एकूण ३६ जिल्हे आहेत. राज्यातील प्रत्येक महसुली जिल्ह्यासाठी सह जिल्हा निबंधकाचे कार्यालय जिल्हा पातळीवर कार्यरत आहे. कामकाजाच्या सोयीसाठी पुणे, ठाणे, व नागपूर या जिल्ह्यांमध्ये शहरी व ग्रामीण क्षेत्राकरिता स्वतंत्र सह जिल्हा निबंधक कार्यालये कार्यरत आहेत. वाशिम, गोंदिया, हिंगोली व नंदुरबार या नवीन जिल्ह्यांसाठी स्वतंत्र सह जिल्हा निबंधक कार्यालये नसून या जिल्ह्यांसाठी अनुक्रमे अकोला, भंडारा, परभणी व धुळे या जिल्ह्यांचे सह जिल्हा निबंधकच त्यांचे कामकाज पाहतात.
मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळता
राज्यातील सह जिल्हा निबंधक यानांच त्या त्या जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रासाठी मुद्रांक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. मात्र मुंबई शहर जिल्ह्यासाठी मुंबई जिल्हाधिकारी यांचे स्वतंत्र कार्यालय आहे. तर मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी अंधेरी, बोरिवली व कुर्ला या तीन तालुक्यांसाठी स्वतंत्र कार्यालये अस्तित्वात आहेत.
सह जिल्हा निबंधक कार्यालय चे मुख्य काम, त्या त्या कार्य क्षेत्रातील दुय्यम निबंधक कार्यालयांवर पर्यवेक्षण व नियंत्रण ठेवणे आहे. या नुसार खालील प्रकारचे कामकाज पाहतात.