महाराष्ट्रात राज्यात दस्त नोंदणी करणाया करता एकूण ५०७ दुय्यम निबंदक कार्यालये कामकाज पाहतात, प्रत्येक तालुकायत, ग्रामिणत भागात १ कार्यालये आहे.
नोंदणी कार्यालयाच्या कामकाजाचे स्वरूप नोंदणी कार्यालयात खालील प्रकारचे कामकाज केले जाते.
- दस्ताची नोंदणी करणे.
- दास्ताच्या सूचीची प्रमाणित नक्कल करणे.
- दस्ताची प्रमाणित नक्कल देणे.
- शोध उपलब्ध करणे.
- नोटीस ऑफ इन्टिमेशन फाईल करून घेणे.
- जुना मूळ दस्त नोंदणी पूर्ण करून परत देणे.
- मुद्रांक शुल्क भरण्याच्या प्रयोजनार्थ मूल्यांकन अहवाल देणे.
- दस्त नोंदणी संदर्भात गृह भेट देणे.
- विशेष कुलमुखत्त्यार पत्राचे अधिप्रमाणन करून देणे.
- मृत्युपत्रकर्त्याच्या मृत्यूनंतर मृत्युपत्र नोंदणी करणे.
निबंधक कार्यालयची वेळ व इतर माहिती महाराष्ट्र राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालयाचे कार्यक्षेत्र, दूरध्वनी, ईमेल आयडी, पत्ते व कार्यालयांच्या त्रि-अक्षरी (संक्षिप्त ) नावांची यादी या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालये. मात्र, नागरिकांच्या सोयीसाठी, मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, कल्याण, पनवेल व पुणे येथील काही कार्यालये
- सकाळी ०७ : ०० ते दुपारी ०२ : ४५ पर्यंत
- सकाळी ०९ : ४५ ते संध्याकाळी ०६ : १५ पर्यंत
- दुपारी ०१ : ०० ते रात्री ०९ : ०० पर्यंत
कार्यरत असतात व या वेळेमध्ये दस्त नोंदणीसाठी सादर करता येतो.
कामाचे दिवस : सोमवार ते शुक्रवार पर्यंत कार्यालये कार्य करतात. शनिवार व रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यां दिवशी कार्यालय बंद राहतील. जर आपणास अधिक मदतीची गरज असेल तर आपण नोंदणी आणि मुद्रांक विभाग महाराष्ट्र (पुणे) यांचे दूरध्वनी मदत क्र. ८८८८००७७७७ वर संकर्प साधावा.