वार्षिक मूल्य दर तक्ते सन १९८९ साली तयार करणेची पध्दत सुरु झाली.

नोंदणी व मुद्रांक महानिरीक्षक व मूल्यांकन कार्यालय पुणे, महाराष्ट्र शासन दर वर्षी स्थावर मालमत्ता मूल्य दर जाहीर करते. वार्षिक मूल्य दर तक्ता सामन्यां इंग्रजी भाषेत (रेडी रेकनर) म्हणतात. सदर वार्षिक बाजारमुल्य दर तक्ते आता पर्यन्त प्रत्येक वर्षीच्या १ जानेवारी पासून ते ३१ डिसेंबर त्या त्या वर्षा पर्यंत जाहीर करण्यात येत होते.

महाराष्ट्र मुद्रांक ( मिळकतीचे वास्तव बाजार मूल्य निश्चित करणे ) नियम १९९५ अंतर्गत तयार केलेले जाते, जमीन व इमारतीचे दर दर्शविणारे तक्ते म्हणजे वार्षिक मूल्य दर तक्ते. जमीन व इमारतीचे खरेदी - विक्री, करारनामा, खरेदीखत, विक्री करार, अदलाबदलपत्र, विक्री प्रमाणपत्र, वाटपपत्र, कुलमुखत्यारपत्र ( मोबदला घेऊन अथवा मोबदला न घेता तिऱ्हाईत इसमास मिळकतीची विक्री करण्यासाठी दिलेले कुलमुखत्यारपत्र ), संव्यवस्था, भाडेपट्टा, भाडेपटयाचे हस्तांतरण व विकसन करारपत्र या दस्त ऐवजाचे विषयवस्तू असलेल्या ( म्हणजेच दस्तात नमूद ) मिळकतीचे खरे बाजार मूल्यानुसार मुद्रांक शुल्क विचारात घेतले जाते. दस्त नोंदणीसाठी मुद्रांक शुल्क भरविणेकामी वास्तव बाजारमूल्य निश्चिती करणाया साठी ताच्या उपयोग करणे अवाक्ष आहे.


नियमात सुधारणा

दिनांक ३१ डिसेंबर २०१५ : मिळकतीचे खरे बाजार मुल्य निर्धारित करण्याचा नियम १९९५, ह्या नियमामध्ये सुधारणा करुन हे तक्ते आर्थिक वर्षा नुसार प्रत्येक वर्षीच्या दिनांक १ एप्रिल रोजी जाहीर करण्यात येतात.



सूचना

दर वर्षी १, एप्रिल रोजी वार्षिक बाजार मूल्य दर (रेडीरेकनरचे दर) जाहीर केले जातात. परंतु सन २०२० - २१ या आर्थिक वर्षाकरिता वार्षिक बाजार मूल्य दर (रेडी रेकनर दर ) कोरोना सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे सद्य स्थितीत पुढील सरकारी आदेशानुसार सन २०१९ - २० चेच मूल्य दर दिनांक ३१ मे २०२० पर्यंत कायम ठेवण्यात आलेले आहेत याची कृपया नोंद घ्यावी.



२०२४


मूल्य दर पहा

२०२३


मूल्य दर पहा

२०२२


मूल्य दर पहा

२०२१


मूल्य दर पहा

२०२०


मूल्य दर पहा

२०१९


मूल्य दर पहा

२०१८


मूल्य दर पहा

२०१७


मूल्य दर पहा

२०१६


मूल्य दर पहा

२०१५


मूल्य दर पहा

  • नोंदणी कार्यालय महानिरीक्षक
  • नोंदणी उपमहानिरीक्षक प्रादेशिक प्रमुख कार्यालये
  • जिल्हाधिकारी मुद्रांक कार्यालय, मुंबई
  • सह जिल्हा नबंधक कार्यालये ३४
  • संयुक्त संचालक मूल्यांकन कार्यालय, पुणे
  • उपसंचालक नगररचना, मूल्यांकन कार्यालय मुंबई
  • सहाय्यक संचालक नगररचना, मूल्यांकन कार्यालय
  • प्रधान मुद्रांक कार्यालय, मुंबई
  • सरकार फोटो नोंदणी कार्यालय, पुणे
  • उप निबंधक कार्यालये ५०४
  • विवाह कार्यालये